Sudhagad Sarasgad Trek




आज विषय जरा वेगळा आहे...ब्लॉगच काम इकडे आहे...दिपक भाऊ अशी काम नको रे...आपण हवं तर दिवस भर सह्याद्री फिरू...पण तुझ्या सारख लिहायला जमणार नाही तरी छोटासा प्रयत्न...बघू....
सह्याद्री मध्ये प्रत्येक जण स्वतःच्या आवडीने भेटायला येत असतो इकडच्या वाऱ्याशी मैत्री करून मातीची एकरूप होऊन डोंगरवाटा तुडवत असतो....मग ही मंडळी निघतात सह्याद्रीतील घाट माथ्यावर भटकायला...कस आहे…खरा भटक्या बारा महिने सह्याद्री अनुभवत असतो म्हणूण नवीन विषय नविन भटकंती..!
रतनगडाच्या आठवणी ताज्या असताना सुधागडचा माहोल हि तयार  झाला व्हाट्सअँप ग्रुप वर भराभर पोस्टीचा पाऊस पडू लागला आणि  सुधागडला जाण्याचा प्लॅन तयार झाला.
नियोजनानुसार सगळे शनिवारी रात्री मी जयेश सुशिल जयवंत किशोर गांधीनगर जमलो मग काय  आमच्या हक्काचा माणूस मया आला ना विंचू SCORPIO घेऊन मग काय बाप्पाच्या जयघोषाणे गाडी मुंबापुरी वरून पालीकडे भरधाव वेगाने रवाना झाली.प्रत्येकाने आपापला कानोसा धरून टांगा पलटी करायला सुरुवात केली.काही तासांनी आम्ही जयेश भाऊनी आणलेल्या चाय साठी थांबलो. चाय
छान होती भावा फक्त पुढच्या ट्रेकला साखर कमी टाक.गाडी पून्हा रवाना केली पाली कडे त्यात अप्पर डिपरचा खेळ चालू होता त्यात खेळात गोष्टी कोणत्या रंगल्या असतील तर चकवा 👻 पकडेल.काही तासाच्या प्रवासानंतर जिपीएस साहेबांच्या मदतीने ५ ते ५.१५ च्या सुमारास ठाकूरवाडीत येऊन पोहोचलो.उजेड झाल्या खेरीज चढाई सुरु करता येणार नव्हती,बसल्या जागी डासांची करमणूक चालू होती. कोंबड्याच्या🐔 बागेने गावाला जागा येऊ लागली.मग आम्ही सहाच्या सुमारास गड चढायला सुरुवात केली.जसजसा सुर्य🌄 नारायण वर येत होता तस तसा त्याचे तांबड किरणे  सुंदरता वाढवत होती ते न्याहाळतच आम्ही काही वेळातच गडाच्या पायथ्याशी येउन पोहोचलो नुकताच पाऊस सरून गेल्यानं हिरवाई लाटली होती,पायवाटा लुप्त झाल्या होत्या.चढताना धाप लागत होता,तरीही पाय थकत नव्हते उत्साहाच्या भरात आम्ही निम्म अंतर पार केला.निवांत चालून गेल्याने अशा रम्य वातावरणात आमचा कॅमेरा रंगात आला होता सभोवतालच्या निसर्गाचे खूप फोटो मिळाले.
आता समोर भल मोठ पठार त्याच्या बाजूने  पसरलेला सह्याद्री...आहाहा..!जणू स्वर्ग...!


या पठारावरून उभे राहिल्यावर घणगड कोरीगड तैलबैल्या दिसतो.थोड पुढे गेल की एक वाडा दिसला.हा पंत सचिवाचा सरकारवाडा.हा ई.स  1705 साली बांधला.आश्चर्य या गोष्टीच वाटलं की  अजूनही मजबूत अवस्थेत आहे आणि ते ही जूने बांधकाम.मग आम्ही या भव्य वाडा फिरायला सुरवात केली.वाड्याला दोन दरवाजे आहे. दोन  खोल्याही आहेत.एका खोलीत स्वयंपाकाची भांडी आहेत.अजूनही वाड्याची स्वच्छता तशीच ठेवली आहे.
अजून थोडं पुढे गेल्यावर भोराई देवीच मंदिर आहे.देवीच दर्शन घेऊन  बाहेर आलो तसा गडाचा विस्तार खूप मोठा आहे.आम्ही ही नवखे होतो त्यामुळे आम्हाला महादरवाजा मिळेना.थोडं अंतर कापल तसच किशोरभाऊनी वाट शोधत शोधत महादरवाज्या जवळ आलो…अप्रतिम...!! आता मात्र सगळ्यांचे डोळे विस्फुरले होते,सगळ्यांच्या अंगातला क्षीण आपोआप कमी झाला असेलच कारण थोडं पुढे आल्यावर समोरचं दिसला तो महादरवाजा...सुधागडचा महादरवाजा,
जणू या दरवाजाकडे पाहिल्यावर रायगडाच्या महादरवाजाची आठवण झाली.तितकेच मजबूत बांधकाम आणि इतक्या उंचावर कस हे साध्य केल असेल.किती किती मेहनत आपल्या पूर्वजांना घ्यावी लागली असेल. स्वराज्याच रक्षण करण्यासाठी हे गडकोट उभे केले. हे गडकोट म्हणजे आपला जिता जागता,प्रत्येक मराठ्याच्या नसानसांत वाहणारा जिवंत इतिहास आणि त्याच इतिहासाचे हे साक्षीदार असलेला हा सह्याद्री आणि याच सह्याद्रीतल्या या सुधागडला पाहून मन थक्क होत होत. अंगातली रग रग मोहरून आली होती. किशोर आणि जयेश यांनी मोठ्या आवाजात महाराजांची गारद बोलून पुन्हा नवीन जोश निर्माण झाला.अंगात एक नवीन ताकद निर्माण झाली.आत शिरल्यावर तटबंदीची थोडी पडझड दिसून आली.असो किल्ला सर केल्याच समाधान लाभलं.खाली पाहतो तर समोर आ वासून पाहणारी खोल दरी दिसली. खर तर वाट कोणालाच माहित नव्हती, पण गड किल्ले फिरण्यासाठी बदनाम असलेले सुशिल आणि किशोर यांनी याच वाटेने उतरू असे सांगितल.पण गडावर चढायला उतारयला एकही पायरी शिल्लक नाहीय.पाण्याच्या प्रवाहाने येथील पायऱ्या नष्ट झाल्या होत्या.छोटे मोठे दगड वाहून, घसरून संपूर्ण रस्ताच गायब झालेला दिसून आला. त्यातून मार्ग काढताना चांगलीच दमछाक होत होती.जवळ जवळ एक तासाभरानी आम्ही निम्मा गड उतरलो होतो.आता हात पाय थकले होते.
वाटेत हनुमान मंदिर लागलं.एका भल्या मोठ्या झाडाखाली एखादा तपस्वी भासावा असा हा मारुतीरायाचा अवतार.बाजूने पडझड झालेला कठडा,भिंती आणि मध्ये हि असणारी मारुती रायांची मूर्ती मनाला खूप शांती आणि चैतन्यदायी शक्ती देवून जाते.
१५ /२० मिनिटे उतरून पुढे गेल्यावर तानाजी टाके म्हणून एक तानाजी तलाव लागलं.एका भल्या मोठ्या पाषाणी दगडात कोरलेल्या/खोदलेल्या या तलावातले थंड पाणी आणि विसावा घेतला एक नवल वाटलं हे बांधकाम कौशल्य पाहून काय योजना असेल हा किल्ला बांधताना एका दगडात तलाव खोदने हे काय साधेसुदे काम नाहीय...!
त्या आश्चर्य शोधतात त्याना सांगा ना आमच्या सह्याद्रीत फिरा अशी अगणित आश्चर्य दाखवू...असो
पण वाट काही सापडायला तयार नव्हती...अजून आमच्या डोक्यावर प्रश्नचिन्ह होतं आता काय...?
आमचे पार्टी बाकीचे अध्यक्ष जयेश भाऊ म्हणाला अरे चला वरून परत फिरू...
अरे वेडा आहे का..?माघार शक्य नाही कारण सुशिल आणि किशोरने आशा काही सोडली नव्हती...पुढे वाट आहे गाव दिसतंय या आशेवर आम्ही पावलं टाकत होतो.गप्पा गोष्टी करत चालत होतो तेच पुढे गाव दिसलं आणि जिवात जीव आला.त्या गावाचा आडोसा घेत आम्ही रोड वर येऊन पोहोचला. रोड वर आलो खरं पण आमची गाडी जवळ जवळ दहा एक किलोमीटर लांब होती आता मात्र पोटातले कावळे शांत होईना.रस्ता चालत असताना देवासारखा बाईकस्वार धाऊन आला त्याने आम्हाला गाडी कडे सोडलं...एव्हाना फक्त एक- दीड वाजला असेल...परत गाडी पाली कडे रवाना केली.गाडी बसून सगळे सुखावले होते.
खरं तर प्लॅन नुसार सुधागड होता...पण नेमकी त्या दिवशी संकष्टी होती,मग काय पाली हे गाव अष्टविनायकातील गणपती साठी प्रसिध्द आहे.पाली मधील गणपती बल्लाळेश्वरच दर्शन घेऊ मग सरसगड करू...अस काहीसं ठरलं...पोटात कावळे ओरडत होते.सुधागडला मागे टाकत मंदिराकडे येऊन पोहोचलो.थोडं फ्रेश होऊन दर्शनासाठी गेलो...त्यात संकष्टी आणि अष्टविनायकांची यात्रा करणारे भावीक दर्शनासाठी नेहेमीच पालीला येतात.उभ राहायची ताकद कोणात नव्हती.त्यात ही गर्दी पाहून खूप भूक लागली...बाप्पाच दर्शन घेतलं.
समोर दिसणारा आडदांड सरसगड खुणावत होता.पण भूकेपुढे सर्व काही क्षम्य म्हणत आधी एका हॉटेलात शिरलो आणि जेवणावर आडवा हात मारला.सगळ्यात महत्वाचं माणूस होता तो म्हणजे मया त्यालाच गाडी चालवायची होती...त्याला आराम करायला सांगितला...आम्ही गडावर जाण्यासाठी मार्गस्थ झालो...!

गड सर करायला एक तास लागतो...अस ऐकलं होतं
ऐक तासाभरात होऊन जाईल... जेवढ ऐकायला सोपं वाटलं तेवढं ते नव्हत...कारण नावातच सरस होता...गडाकडे निघालो तेच वरूनराजा बरसू लागला.खरं म्हणजे वेळ खूपच कमी राहीला होता...रान खूप वाढलं होतं त्यात वाट लपली होती कशीतरी पायवाट शोधत होते पाऊस मात्र कमी होईना. किल्ले कधीही केले तरी घाम काढतातच.त्यामुळे हाश-हुश करत दगडावर स्केटिंग केल्याचा अनुभव घेत आम्ही चढत होतो.पुन्हा एकदा दहा-पंधरा मिनिटे खडी चढाई करून त्या कातळकड्यांपाशी आलो.
कातळात कोरलेल्या तब्बल ९६ घसरड्या पायऱ्या आपल्याला गडावर घेऊन जातात.एकेका पायरीची उंची दीड-एक फूट असल्याने वर जाईपर्यंत चांगलीच दमछाक होत होती,पण पुढे असलेला अखंड कातळात कोरलेला दरवाजा बघितल्यावर या दमणुकीचे काहीच वाटत नाही.तसा गड फिरायला दोन तास लागतात.आमच्याकडे वेळ कमी असल्याने तेथूनच फिरावं लागलं....

खाली उतरताना मात्र आमची छाती विशेषतः जयेश
ची चांगलीच धडधडत होती.पावसाची एक जोरदार सर येऊन गेल्याने पायऱ्या अजूनच निसरड्या झाल्या होत्या.पण उतरायला जास्त वेळ लागला नाही...या उभ्या काताळात कश्या पायऱ्या कोरल्या असतील हा विचार करतच कधी गाडी कडे आलो समजलं नाही.
खरंतर या ट्रेकबद्दल भरभरून लिहायच मनात होतं पण सध्या कामात व्यस्त असल्याने वेळ मिळत नसल्याने वृतांत थोडक्यात आटोपतोय.
अजून खूप किस्से आहेत
पुढच्या ट्रेकला भेटू...तेव्हा सांगतो
तस या वेळी टिम लहान होती दिपक,रणजित दादा,सुप्रिया,लक्ष्मी,साक्षी मॅडम,
अमृता तुमची कमी भासली कारण त्रास द्यायला कोणि भेटल नाही....
मया तुझे पण खुप खुप  आभार...! व्यवस्थित आणून पोहोचवल्या बद्दल...!

Comments

Popular posts from this blog

Sankshi Fort

वासोटा एक अभूतपूर्व प्रवास

ढाक-बहिरीचा थरार