Posts

Showing posts with the label school marathi blogs sahyadri shala sahyadri marathi vachak

पहिला शाळेचा दिवस

Image
पहिला पाऊस..पहिल्या शाळेचा दिवस... मे महिन्याचा उन्हाळा असह्य होऊन जाऊन त्यात मुलांची सुट्टी चालू असते,हा महिना सगळ्यांना कासावीस झालेला असतो,उन्हाच्या झळाळीने सगळेच त्रस्त झालेले असतात.शेवटी जून महिना उजाडतो,लहानग्यांची शाळेची तयारी चालू होते,त्यांना गेल्या वर्षी बसलेल्या मोठ्या भावाची किंवा नातलगांची पुस्तके दिली जातात,नवीन वह्या,नवीन पुस्तके,त्यात त्या पुस्तकांचा असलेला सुगंध पोर घेत घेत शाळेच्या तयारीला लागतात,गेल्या वर्षीची माळ्यावर ठेवलेली छत्री आईने काढून ठेवलेली असते.वडिलांनी नवीन गणवेश आणून ठेवला असतो.पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट हा ठरलेला गणवेश दरवर्षी असतो. शेवटी शाळेत जायचा दिवस उजाडतो,त्यात पाऊस हि जोरदार पडायला सुरुवात झालेली असते.नवीन गणवेश आणि गेल्याच वर्षीच दफ्तर खांदयावर लटकावून पायात पावसाळी चप्पल घालून जुनी छत्री खांद्याला लावून लहान पोरं शाळेच्या दिशेने धावत सुटतात. शाळेत पोचल्यावर गेल्याच वर्षीच्या फळ्यावर डावीकडच्या जागेवर तारीख टाकून त्याच्या वरच्या जागेवर सुविचार तो हि एकच '' नेहमी खरे बोलावे ''.शाळेत गेल्यावर दोन महिन्यानंतर भेटलेले मित्र,नवी...

एका खेडेगावातील थंडीची सुखद चाहूल…..

Image
एका खेडेगावातील थंडीची सुखद चाहूल….. अशीच माझ्या गावातील सुंदर पहाट . ती पहाट जणु काही भव्यदिव्य करू पाहत होती . त्यात ते सकाळचे मनोहर दृश्य मनाला काहीतरी नवीन चैतन देत होते . मनाला आणि माणसाला हवाहवासा वाटणारा तो शिशिरातील महिना . त्यातच ते कोंबड्याचे बांग देऊन सगळ्यांना जागे करण्याचे काम . शहरातील आणि गावातील थंडीमध्ये खूपच फरक जाणवतो . तसे पण ते गावातले लोक पण कोंबडा आरवण्याचा आधीच उठलेले असतात , आणि आपआपले दिनक्रम उरकायच्या मार्गाला लागले असायचे . हळूच बाजूच्या घरातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत असायचा , त्यातच आम्ही त्या थंडीतून लहानपणी शाळेला जात असोत , त्यावेळी आम्हाला उठायचा खूपच कंटाळा यायचा , तरीही त्याच कुडकुडत्या थंडीतून आम्ही सगळी भावंडे अंगावर गरम पाणी घेत असत , त्यानंतर गरमागरम चहा ओठाला लावताच ती थंडी कुठल्या कुठे पळून जायची , त्यानंतर आई आम्हाला स्वेटर घालून शाळेत पाठवायची , घरातून पाय ठेवल्यावर ती थंडी पूर्ण अंगात शहारे उठून आणायची . आम्...