वासोटा एक अभूतपूर्व प्रवास
वासोटा एक अभूतपूर्व
प्रवास...
Bhatki Bhut Team |
सांगायचं असं होत कि काहीच
दिवसापूर्वी मी भटकी
भूत ह्या ग्रुप
सोबत चंदेरी ट्रेक
केला होता पण त्या वेळी
आम्ही खूप धमाल
केली होती.त्याच
आठवणी संपतात तो
पर्यंत राकेश ने
नवीन प्लॅन टाकला
होता तो म्हणजे
वासोटा किल्ला.
मग शेवटी
प्लॅन पक्का झाला
होता आणि नाही
म्हणता म्हणता पंधरा
जण ग्रुप मध्ये
जमा झाली.शेवटी
जायचं ठरलं होत
२७ ला रात्री.आमच्या ग्रुप
मध्ये राकेश,सुशांत,अमोल,दर्शन,चंद्रास संकेत,हि
भटकी भूतच तर होतीच त्याशिवाय
किरण आणि जयेश
हे सुद्धा होतेच.आता ह्या
ग्रुप नवीन मित्रमंडळीनींची
भरती झाली होती
ती म्हणजे अमित,तेजस,भावेश,महेश,अभिषेक,किरण.
शेवटी निघायची
रात्र जवळ आली शुक्रवारी सगळे आम्ही
भेटलोच.ओळख नसल्याने
प्रत्येक जण आपल्या
मित्रांमध्येच व्यस्त होते
शेवटी मोठा प्रवास
असल्याकारणामुळे सगळे लवकर
झोपून गेले.सकाळी
६.३० ला गाडी थांबली
होती ती पण चहा नाश्ता
करायला.सगळ्यांनी रात्रीची
झोप उडवून चहा
आणि पोहे खाऊन
परत किल्ल्याच्या वाटेला
लागलो.गाडी आता
किल्ल्याच्या दिशेने भरधाव
वेगेने धावू लागली,सकाळ असल्याकारणाने
वातावरण खूपच छान
वाटत होते,खिडकीतून
पहिलेला नजर खूपच
छान होता,वर्णन
करणे अश्यकच.समोर
दिसणारे लांब लांब
पसरलेले डोंगर, त्यावर
पडलेला सोनेरी किरणांचा
प्रकाश.डोंगरावर लावलेल्या
पवनचक्क्या हळूहळू आपला
आळस दूर करण्याचा
प्रयत्न करत असाव्यात
असे चित्र दिसत
होते.असे आम्ही
निसर्गाचे विलोभनीय दृश्य पाहत
पाहत बामणोली गावात
पोहोचलो.
बामणोली गावात पोहोचल्यावर
सगळ्यात पहिले फ्रेश
होऊन एक गरमागरम
चहा घेऊन कोयना
जलाशयाकडे चालू लागलो.तोपर्यंत राकेश आणि
सुशांत ने फॉरेस्ट
डिपार्टमेंट कडून परमिशन
घेऊन बोटीतून येण्या
जाण्याची तिकीट सुद्धा
काढून आला होता.शेवटी सगळे
बोटी पर्यन्त पोहोचले
शेवटी गणपती बाप्पा
मोरयाचा आवाज देऊन
बोट चालू करण्यात
आली.कोयना नदीच्या
त्या पाण्यातून ती
बोट अंतर कापत
कापत आता महाराष्ट्रातील,
कोयना नदीच्या खोर्य़ात, निबिड
अरण्यात वसलेल्या दुर्ग असलेला ‘किल्ले वासोटा’ कडे
प्रस्थान केले.बामणोलीहून
कोयना धरणाचा शिवसागर
जलाशय लाँचने पार
करायला दीड तास लागला.
आम्ही
आता वासोटा अभयारण्यात
उतरलो होतो तेथूनच
पुढे चालून गेल्यावर
वनखात्याचे ऑफ़िस लागते
तिथे आम्ही आपली
पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या
यांची नोंद केली व
त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूसाठी रुपये
१०/- डिपॉझिट भरल्यावर
गडावर जाण्याची परवानगी
मिळाली. (ट्रेक हून
परत येताना नेलेल्या
सर्व वस्तू परत
दाखवल्यावर डिपॉझिट परत केले
जाते. जंगलात होणारा
प्लास्टीकचा कचरा कमी
करण्यासाठी जंगलखात्याने ही अभिनव
योजना चालू केली
आहे.) जंगल चालू
लागल्यावर वन खात्याच्या
कार्यालया मागून जाणारी
वाट आम्ही पकडली,१५ मिनिटात
एका छप्पर नसलेल्या
मंदिरापाशी येऊन पोचलो
येथे हनुमानाची व
गणपतीची मुर्ती आहे.त्याच्या पाठीमागेच ओढ्याचे
नितळ व स्वछ पाणी आहे.हाच एकमेव
पाण्याचा साठा आहे
ह्यापुढे पाणी कुठेहि
नाही. पुढे ओढा
ओलांडल्यावर आम्ही वासोट्याचा
चढ चालू केला
होता.इथून आमचा
कस लागला होता,
उन्हाचा तडाखा खूप
असल्याकारणामुळे सगळे दमले
होते व पाण्याची
कमतरता जाणवू लागली
होती.शेवटी आम्ही
दमात थकत साधारणपणे
१ ते १.३० तासात
आम्ही वासोटा आणि
नागेश्वरच्या फ़ाट्यावर पोहोचलो. येथून
उजवीकडे जाणारी वाट
नागेश्वरला जाते.आता
मात्र उन्ह खूपच
होतं आणि उभी चढण लागली
होती,परत सगळ्या
मुलांनी एका दमात
ती चढण पार करून एका
पठारावर आले.समोर
वासोटा किल्ल्याची तटबंदी
दिसत होती आणि
जुनाट पायऱ्यां.त्या
पठारावरून समोर कोयना
जलाशयाचा विस्तृत परिसर दिसत
होता,आजूबाजूला घनदाड
जंगल दिसत होते.आंम्ही त्या
पायऱ्या चालून वरती
आलो.
आम्ही
पायऱ्या चढून दरवाजा
ढासळलेल्या अवस्थेत आहे तिथे
पोहोचलो. दरवाजाने गडावर प्रवेश
केल्यावर समोरच मारुतीचं
बिन छपराचं मंदिर
आहे.तिथे आम्ही
दर्शन घेतल्यावर सगळ्यांना
खूपच भूक लागली
असल्याकारणाने पहिला जेवण
करायचं ठराव. जेवायला
तर भारीच होत
चपाती त्यासोबत वाटाण्याची
भाजी सोबतीला लोणचं.एवढं सगळं
खाल्यावर सगळ्यांची पोट आता टमटमीत भरली
होईतो आणि चालताना
जे दमले होते
त्यांचे तोंड आता
जरा जेवणामुळे चांगली
वाटत होती. वनभोजन
केल्यानंतर
आम्ही जंगलाची वाट
पकडली आणि आम्ही
बाबु कड्यापाशी येऊन
पोहोचलो . या कड्याचा
आकार इंग्रजी ’यू’
अक्षरा सारखा आहे.
याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या
कोकणकड्याची आठवण येते.
या कड्यावरून समोरच
दिसणारा आणि आमचं लक्ष
वेधून घेणारा उंच
डोंगर म्हणजेच ‘जुना
वासोटा होय.इथेच
आम्ही थोडं फोटोशूट
केलं आम्ही आता
पुढे गेल्यावर जोड
टाकी पाहून परत
मारुती मंदिरापाशी येउन
उजव्या बाजूस जाणारी
वाट पकडली ही
वाट ’काळकाईच्या ठाण्याकडे’
जाते. या वाटेवर
पहिल्यांदा डाव्या हाताला
एक मोठा तलाव
दिसतो.या तलावातील
पाणी पिण्यायोग्य नाही.
पुढे गेल्यावर महादेवाचे
सुंदर मंदिर व त्याबाजूची वास्तू पाहायला
मिळते. येथून चिंचोळी
वाट माचीवर घेऊन
जाते. या माचीला
पाहून लोहगडच्या विंचूकाट्याची
आठवण येते. या
माचीलाच काळकाईचे ठाणे
म्हणतात. या माचीवरून
दिसणारा आजुबाजूचा घनदाट
झाडांनी व्यापलेला प्रदेश,
चकदेव, रसाळ, सुमार,
महिपतगड, कोयनेचा जलाशय हा
संपूर्ण देखावा मोठा
रमणीय आहे हा परिसर पाहून
आम्ही आता परतीच्या
वाटेला लागलो.
परतीची
वाट आम्ही लवकरात
लवकर उतरायची होती.कारण परत
बामणोली गावात जाऊन
टेन्ट लावायचे होते.आम्ही पटापट
खाली उतरून परत
त्याच ओढयाजवळ पोहोचलो
परत तिथे थोडा
फ्रेश झालो.डेपोसिट
परत घेऊन आम्ही
बोटीने परत बामणोली
गावात जाण्याचा प्रवास
चालू केला.
परत काही
तासातच आम्ही बामणोली
गावात पोहोचलो. गावात पोहोचल्यावर
राकेश सर्वात प्रथम जेवण सांगितले त्यानंतर सगळ्यांनी आपआपले टेन्ट लावून आंघोळी करायला
गेले.काहीजणांची आंघोळी आटपल्यानंतर त्यांनी चाईनीस भेळ बनवली आणि आंघोळी केल्यानंतर
सगळं थकवा गेला होता त्यात पोटात एवढे कावळे ओरडत होते कि सगळ्यांनी दोन-दोन प्लेट्स
भेळ खाली.काही तास आराम केल्यांनतर आम्ही आता जेवायला गेलो,जेवायला मस्त पैकी गावरान
चिकन आणि भाकरी अशी पूर्ण मांसाहारी थाळी दिली होती.पोरांच्या पोटात आगच एवढी पडली
होती कि सगळ्यांनी त्यावर आडवा हात मारायला सुरुवात केली.काही मिनिटातच सगळ्यांचा पोटोबा
तृप्त झाला होता.थोडा वेळ तिथेच आराम केला,काही वेळानंतर आम्ही टेन्ट जवळ येऊन पोचलो.
तास त्या दिवशी संकेतचा बर्थडे होता म्हणून वेळ
कसा घालवावा म्हणून सगळ्यांनी आपआपले गडकिल्ल्यांचे किस्से सांगायला सुरुवात केली आणि
बोलता बोलता १२ कधी वाजले समजले सुद्धा नाही.शेवटी १२ वाजता संकेतच बर्थडे साजरा केला
आणि सगळे झोपायला गेले.अमितची तबीयत ठीक नसल्यामुळे संध्याकाळ पासून तो झोपलाच होता.त्याची
आता झोप पूर्ण पूर्ण झाली होती,आता शेवटी आम्ही मी,संकेत,राकेश,चंद्रास,आणि अमित असे
आम्ही बाहेर झोपायचे ठरवले.काही वेळातच चंद्रास आणि राकेश झोपी गेला.संकेत आणि अमित
माझ्यासोबत चांदण्यांचे फोटो पाहत बसले होते.सुमारे ०३ ते ०३.१५ च्या दरम्यान आमच्या
टेंटच्यामागून काही तरी गेल्यासारखे जाणवले.पण आम्ही काही जास्त लक्ष दिले नाही परत
आम्ही तेच फोटोशूट करण्याचं काम चालूच ठेवलं.परत १० मिनिटांनी तोच आवाज कोणीतरी आपल्या
पाठीमागून चालतंय हाच आवाज आला.त्याच आवाजाच्या भीतीने आम्हीने गुपचूप आपापल्या टेंटमध्ये
जाऊन झोपलो, चंद्रास आणि राकेश ह्यांना खूपच झोप लागली होती त्यांना काहीच समजलं नाही
म्हणून ते बाहेर झोपले होते.शेवटी आम्ही कशी तरी रात्र काढली.पण हि रात्र खरचं आठवणीत
ठेवण्यासारखी होती, रात्री कोयनेच्या पठारावर पाठ टेकून चांदणे पाहणे,कोयनेच्या जलाशय
चांदण्याच्या उजेडाने प्रकाशमय झालेला,सोबत वट वाघळांची भीती.रात्री झालेला आवाज सगळं
काही वेगळाच अनुभव होता.
खरचं हि ट्रेक आठवणीत
ठेवण्यासारखी होतीच,नवीन मिळालेले मित्र,ट्रेक मध्ये केलेली मज्जा,पाण्याचं कळलेलं
महत्व,बोटीने केलेला प्रवास,रात्री केलेला संकेतचा बर्थडे,चांदण्या रात्रीत झोप येईपर्यंत
मारलेल्या गप्पा,फोटो काढून थकलेला फोटोग्राफर तरीही ना थकलेले मॉडेल,ह्या सगळ्यांचा
अनुभव गाठीशी बांधून नवीन ट्रेकची वाट पाहतोय.
खूप छान लिहिले आहेस.
ReplyDeleteएक नंबर दीपक
DeleteThanks
Delete