पहिला शाळेचा दिवस

पहिला पाऊस..पहिल्या शाळेचा दिवस...
मे महिन्याचा उन्हाळा असह्य होऊन जाऊन त्यात मुलांची सुट्टी चालू असते,हा महिना सगळ्यांना कासावीस झालेला असतो,उन्हाच्या झळाळीने सगळेच त्रस्त झालेले असतात.शेवटी जून महिना उजाडतो,लहानग्यांची शाळेची तयारी चालू होते,त्यांना गेल्या वर्षी बसलेल्या मोठ्या भावाची किंवा नातलगांची पुस्तके दिली जातात,नवीन वह्या,नवीन पुस्तके,त्यात त्या पुस्तकांचा असलेला सुगंध पोर घेत घेत शाळेच्या तयारीला लागतात,गेल्या वर्षीची माळ्यावर ठेवलेली छत्री आईने काढून ठेवलेली असते.वडिलांनी नवीन गणवेश आणून ठेवला असतो.पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट हा ठरलेला गणवेश दरवर्षी असतो.
शेवटी शाळेत जायचा दिवस उजाडतो,त्यात पाऊस हि जोरदार पडायला सुरुवात झालेली असते.नवीन गणवेश आणि गेल्याच वर्षीच दफ्तर खांदयावर लटकावून पायात पावसाळी चप्पल घालून जुनी छत्री खांद्याला लावून लहान पोरं शाळेच्या दिशेने धावत सुटतात.
शाळेत पोचल्यावर गेल्याच वर्षीच्या फळ्यावर डावीकडच्या जागेवर तारीख टाकून त्याच्या वरच्या जागेवर सुविचार तो हि एकच '' नेहमी खरे बोलावे ''.शाळेत गेल्यावर दोन महिन्यानंतर भेटलेले मित्र,नवीन आलेले शिक्षक,नवीन अभ्यास ह्याची तोंडओळख होत असताना बाहेर कौलांवर मोठ्या आवाजात कोसळणारा पाऊस,मुलांच्या नजर खिडकीबाहेर असते कि कधी शाळा सुटते आणि आम्ही पावसात जातोय.शेवटी शाळेची घंटा वाजते आणि एकच गलबला होतो. मुलं सगळी पटापट शाळेच्या पटांगणात येऊन छत्री उघडून जमलेल्या पावसाच्या पाण्यात उड्या मारतात.त्यांना भानच उरत नाही आपण शाळेच्या पटांगणात आहोत म्हणून,शेवटी काही वेळाने शिक्षकांचा आवाज आल्यावर गुपचूप एका रांगेत सगळे बाहेर पडून नंतर रस्त्यावर कधी छत्रीच्या काड्याने मित्राच्या शर्टच्या कॉलरमधून आतमध्ये पाणी सोडत तर कधी दफ्तरमध्ये पाणी सोडत भिजत भिजत घरी येतात.
घरी आल्यावर आजी दारातच मुका घेऊन बोलते ''आलं माझं पोरग ते'' तिकडे आई "कार्ट्या" अशी मायेची हाक आणि पाठीत धपाट्याच्या शाबासकी देऊन आईने बखोट धरुन कोरडे केलेले केस, आणि नंतर दिलेले  सुके  कपडे. नंतर करुन दिलेला वाफाळता कपभर गरम दूध.
खूपच भारी होते दिवस...नक्कीच तुम्ही अनुभवले असतीलच.
आताच्या पिढीला काय समजणार काय होते दिवस,आता तर दरवर्षी नवीन दफ्तर,दर सहा महिन्याने घेतलेला गणवेश,नवीन पुस्तके,नवीन वह्या पण आता त्यात तो सुगंध घ्यायला मुलांना वेळ तरी असतो कुठे,त्याच्या हातात मोबाईल जे असतात.ह्या मुलांना काय कळणार आपण त्या वेळी केलेली मज्जा.
म्हणून म्हणतोय आयुष्य खूपच छोटं जेवढं आपल्या,या मर्जीने जगता येईल तेवढं जागा.
Photo-Pankaj zarekar

Comments

Popular posts from this blog

Sankshi Fort

वासोटा एक अभूतपूर्व प्रवास

ढाक-बहिरीचा थरार