पहिला शाळेचा दिवस
पहिला पाऊस..पहिल्या शाळेचा दिवस... मे महिन्याचा उन्हाळा असह्य होऊन जाऊन त्यात मुलांची सुट्टी चालू असते,हा महिना सगळ्यांना कासावीस झालेला असतो,उन्हाच्या झळाळीने सगळेच त्रस्त झालेले असतात.शेवटी जून महिना उजाडतो,लहानग्यांची शाळेची तयारी चालू होते,त्यांना गेल्या वर्षी बसलेल्या मोठ्या भावाची किंवा नातलगांची पुस्तके दिली जातात,नवीन वह्या,नवीन पुस्तके,त्यात त्या पुस्तकांचा असलेला सुगंध पोर घेत घेत शाळेच्या तयारीला लागतात,गेल्या वर्षीची माळ्यावर ठेवलेली छत्री आईने काढून ठेवलेली असते.वडिलांनी नवीन गणवेश आणून ठेवला असतो.पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट हा ठरलेला गणवेश दरवर्षी असतो. शेवटी शाळेत जायचा दिवस उजाडतो,त्यात पाऊस हि जोरदार पडायला सुरुवात झालेली असते.नवीन गणवेश आणि गेल्याच वर्षीच दफ्तर खांदयावर लटकावून पायात पावसाळी चप्पल घालून जुनी छत्री खांद्याला लावून लहान पोरं शाळेच्या दिशेने धावत सुटतात. शाळेत पोचल्यावर गेल्याच वर्षीच्या फळ्यावर डावीकडच्या जागेवर तारीख टाकून त्याच्या वरच्या जागेवर सुविचार तो हि एकच '' नेहमी खरे बोलावे ''.शाळेत गेल्यावर दोन महिन्यानंतर भेटलेले मित्र,नवी...