सुधागड सरसगड ट्रेक
नेहमीचा ब्लोग लिहीणारा व्यक्ती आमच्या सोबत नसल्याने ह्यावेळी ब्लॉग लिहिण्याची जबाबदारी चेतन आणि मी घेतली, कारण ऐकून लिहिण्यापेक्षा अनूभवून लिहिलेले चांगलेच नाही का ????, मित्रा दिपक, तुझ्या सारखे लिखाण आम्हाला जमणार नाही, तरी सुध्दा थोडासा आमचा प्रयत्न…… रतनगड स्वारी नंतर कोठे याचा विचार सुरू झाला. काही दिवसांत दिपकने आम्हाला सुधागड बद्दल सांगितले. मग दिवस ठरवला, वेळ ही ठरविली. ठरलेल्या ठिकाणी मी, चेतन, सूशील, किशोर आणि जयवंत भेटलो. थोड्याच वेळात महेश गाडी घेऊन आला. गाडीत बसल्यावर चेतनने बाप्पा मोरया केला आणि आम्ही स्वप्ननगरी ला राम राम करून गाडी पाली गावच्या दिशेला लागली. पुढे काही वेळात चहाचा मुड झाला. आम्ही चहा प्यायला थांबलो. सर्व मी घरातून आणलेला चहा पियाले. चहा तशी छान झालेली, फक्त साखर थोडी जास्त झाली. चहा पिऊन झाल्यावर गाडी पुन्हा पाली मार्गावर लागली आणि तेवढ्यात माझा डोळा लागला. मला जाग आली तेव्हा आम्ही सुधागड च्या पायथ्याशी पोहोचलो होतो. सर्वत्र अंधार पसरला होता. आम्ही सकाळ होण्याची वाट पाहू लागलो. आम्ही ६ च्या सुमारास सकाळ च्या अंधुक प्रकाशात गड चढायला सुरुवा...