वासोटा एक अभूतपूर्व प्रवास
वासोटा एक अभूतपूर्व प्रवास ... Bhatki Bhut Team वासोटा हा प्लॅन खूप दिवसापासून करायचा ठरवलं होता पण जमतं नव्हताच पण म्हणतात ना जर तुमच्या मनात काही इच्छा असतील तर त्या पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत तसेच काही झालं . सांगायचं असं होत कि काहीच दिवसापूर्वी मी भटकी भूत ह्या ग्रुप सोबत चंदेरी ट्रेक केला होता पण त्या वेळी आम्ही खूप धमाल केली होती . त्याच आठवणी संपतात तो पर्यंत राकेश ने नवीन प्लॅन टाकला होता तो म्हणजे वासोटा किल्ला . मग शेवटी प्लॅन पक्का झाला होता आणि नाही म्हणता म्हणता पंधरा जण ग्रुप मध्ये जमा झाली . शेवटी जायचं ठरलं होत २७ ला रात्री . आमच्या ग्रुप मध्ये राकेश , सुशांत , अमोल , दर्शन , चंद्रास संकेत , हि भटकी भूतच तर होतीच त्याशिवाय किरण आणि जयेश हे सुद्धा होतेच . आता ह्या ग्रुप नवीन मित्रमंडळीनींची भरती झाली होती ती म्हणजे अमित , तेजस , भावेश , महेश , अभिषेक , किरण . शेवटी निघायची रात्र जवळ आली शुक्रवारी सगळे आम्ही भेटलोच . ओळख नसल्य...