तो येतोय लवकरच...माझा आवडता पाऊस
अक्ख आकाश काळे पडले आहे,समोरून घोंगावत येणारा वादळी वारा,त्याच तुफान वाऱ्यामुळे लाटांची झालेली आदलाआपट,चक्क लाटा आता बुरुजांवर थडक देत आहेत,तो येत होता तोही सागरी मार्गाने,आता तो सागरी मार्गाने कोकणात आला होता,जंगलातून घो घो आवाज करीत वादळी वाऱ्याने मुसळधार पावसाळा सुरुवात केली,तो धो धो कोसळत होता,आज काही तो न थांबण्याचे मनात ठरवूनच आला होता,त्याच्या त्या टपोऱ्या थेंबानी पूर्ण आसमंत दरवळून निघाला होता,कौलारू घरावर त्याचे मोठे मोठे थेंब आवाज करीत होते,विजांचा लखलखाटने पूर्ण गाव आणि आजूबाजूचा प्रदेश जणू काही उजळून गेला असावा असे भासत होते.ओढे आता भरून वाहत होते,नदी नाले आता तृप्त झाले असावे असे निपचित पडले होते,गोठ्यातील गुरे आपल्या जिभा बाहेर काढून आलेला पाऊस आपल्या मुखात साठवू पाहत होते,तो आता आला होता आणि काही महिने थांबणार नव्हता...त्याच्या येणाने सर्व जीवसृष्टी आनंदित झाली होती. तो आता आला होता.....माझा आवडता पाउस...